आखवणे,भोम पुनर्वसन येथील उबाठाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांचा भाजपात प्रवेश

0
18

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश

वैभववाडी,दि.२६ : आखवणे, भोम पुनर्वसन गावठण येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार पडला. आमदार नितेश राणे यांनी पांचाळ यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे, नासीर काझी , जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, राजा राणे, हुसेन लांजेकर, प्राची तावडे, संजय सावंत, अतुल सरवटे, रोहन रावराणे, स्वप्नील खानविलकर, उदय पांचाळ, सरपंच आर्या कांबळे, डॉ. जगन्नाथ जामदार, आकाराम नागप, रंगनाथ नागप, अभय कांबळे आदी उपस्थित होते.
पुनर्वसन येथे पार पडलेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आपण प्रकल्पग्रस्तांच्या कायम सोबत आहोत. प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असे यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here