सावंतवाडी,दि.२६: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.दीपक भाई केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे आज दिनांक २६ जुलै ते २८ जुलै या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निहाय भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने सुश्राव्य संगीत भजनांची मेजवानीच भजन रसिकांना मिळणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन मंत्री दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य आणि सौ.पल्लवीताई केसरकर यांच्या हस्ते दिनांक २६ जुलै २०१४ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता सावंतवाडी विठ्ठल मंदिरात होणार आहे. तरी सर्व मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,विभागप्रमुख,( पुरुष / महिला ) तसेच शहरप्रमुख,उपशहरप्रमुख, ( पुरुष / महिला ) कार्यकर्ते ,शिवसैनिक तसेच दिपकभाई केसरकर मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ना. दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.