वेंगुर्ले,दि.२५: माजी आमदार तथा भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांचा वाढदिवस वेंगुर्लेत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला . तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप , दप्तर वाटप ,गरीबांना धान्य वाटप , छत्र्या वाटप असे विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला .
वेंगुर्ले शहरात ही खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य एम.बी. चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , संस्था प्रतिनीधी सुरेंद्र चव्हाण , विरेंद्र देसाई , मा.प्राचार्य डाॅ.विलास देऊलकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ , महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर ,महीला जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , किसान मोर्चाचे सत्यवान पालव , युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व हेमंत गावडे , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ , प्रा.अरविंद बिराजदार , प्रा.डाॅ.वसंत नंदगिरीकर , प्रा.दिलीप शितोळे , प्रा.पी.जी.देसाई , मोहन मोबारकर,इंद्रनिल चौगुले , प्रशांत कांबळे तसेच उद्यानविद्या विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते .