सावंतवाडी,दि.०८: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावाच्या शिवसेना शाखाप्रमुख पदावरती श्री संजय लक्ष्मण धुरी यांची निवड करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.