सुदैवाने जीवित हानी टळली, मात्र पायाला गंभीर दुखापत
सावंतवाडी,दि.३०: येथील झाराप पत्रादेवी महामार्गावर मुबंई वरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार रायडर चा नेमळे फौजदार वाडी येथेउपचारासाठी त्याला ऍम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्यात आले अपघात झाला.
यात रायडर च्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन त्याला स्थानिक ग्रामस्थांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.नेमळे फौजदार वाडी सर्कल वर अचानक ब्रेक लावल्यामुळे वेगावरील नियंत्रण सुटून गाडी डीवायडरला आदळून हा अपघात घडला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आठवड्यातुन शनिवार रविवार हे रायडर आपल्या मोटर सायकल ने १०० ते १५० च्या स्पीड ने झाराप पत्रादेवी बायपास वरून मुंबई ते गोवा असा प्रवास करीत असतात.