कुडाळ,दि.०७ : मूळ कुडाळ साळगाव वेशीवाडी येथील रहिवासी आणि सध्या कुडाळ औदुंबरनगर शिवगौरी अपार्टमेंट येथे वास्तव्यास असलेल्या सौ शुभांगी रामचंद्र साळगावकर (७४) यांचे मंगळवार ६ डिसेंबरला सकाळी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत साळगावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुडाळ माजी तालुका मास्तर रामचंद्र सोमा साळगावकर यांच्या त्या पत्नी, कुडाळचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी अरुण साळगावकर यांच्या त्या भावजय, सांगेली हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक हनुमंत लक्ष्मण नाईक यांच्या त्या सासू तर पेंडूर हायस्कुलच्या दिवंगत शिक्षिका पूर्वा हनुमंत नाईक यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दिर, दोन मुली, बहीणी, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे.