सावंतवाडीत काल बघायला मिळाला घोषणांचा पाऊस…

0
90

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांचा केसरकर यांना मिश्किल टोला

सावंतवाडी,दि.०७: आज सात जून या दिवशी “मिरग”पण पाऊस नाही मात्र येथील शहरात काल मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणांचा पाऊस बघायला मिळाला असा मिश्किल टोला कोकण विभागीय अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी केसकर यांना लगावला. सावंतवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मंत्री केसरकर यांनी याआदी सावंतवाडी मतदार संघात वेगवेगळ्या विकास कामांच्या घोषणा केल्या मात्र त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. काल मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध विकास कामांची उद्घाटने करण्यात आली ती तरी वेळेत पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो, कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत सावंतवाडीकरांसाठी आणि सिंधुदुर्गसाठी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांवर महत्त्वाचे निर्णय घेतील अशी अपेक्षा होती मात्र असे झाले नाही याबाबत आम्हाला खंत वाटते अशा शब्दात सौ अर्चना घारे परब यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सौ दर्शना बाबर देसाई ,चराठा ग्रामपंचायत सदस्य सौ गौरी गावडे,महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारीता फर्नांडिस,सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here