डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिक-ठिकाणी महास्वच्छता अभियान..

0
158

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे सकाळी सात वाजता अभियानाची सुरुवात.. पुंडलिक दळवी यांची माहिती

सिंधुदुर्ग,दि.२८: जिल्ह्यातील सावंतवाडी,कणकवली,मालवण कुडाळ,देवगड,वैभववाडी,वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये बुधवार दिनांक एक मार्च रोजी ठीक- ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र भूषण डॉक्टर आदरणीय तीर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त या महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून उद्या बुधवार दिनांक १ मार्च रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी सात वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकारातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here