रोणापाल गावच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे योगेश अशोक केणी यांची बिनविरोध निवड..

0
29

बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी,दि.०८: तालुक्यातील रोणापाल गावचे विद्यमान उपसरपंच कृष्णा परब यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आज उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रतिभा आळवे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी यांचा एकमेव अर्ज आल्याने सदर निवडणूक ही बिनविरोध झाली. यावेळी सरपंच योगिता केणी, ग्रामपंचायत सदस्य नमिता शेगडे, अश्विनी गावडे, नंदकिशोर नेमण, कृष्णा परब, आदी उपस्थित होते. व निवडणूक बिनविरोध झाली.भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, डेगवे माजी सरपंच तथा मंडळ सरचिटणीस मधुकर देसाई, निगुडे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे , रोणापाल माजी उपसरपंच कृष्णा परब आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. विशेष बाब म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावच्या पत्नी सरपंच व पती उपसरपंच विद्यमान म्हणून ग्रामपंचायत कारभार हाताळणार आहेत.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी बोलताना सांगितले की भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उज्वल भारत घडवायचा आहे त्याकरिता ग्रामपंचायतीतूनच सुरुवात करायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतला दिला जाईल त्यामुळे आपण गावच्या विकासासाठी जे जे काम हाती घ्याल त्यासाठी आमचा पूर्णपणे पक्षाचा पाठिंबा आहे असं अभिवचनही दिले, तसेच पुढील २०२७ रोणापाल ग्रामपंचायतसाठी आरक्षण हे खुला प्रवर्ग पुरुष पडल्यामुळे आपण सातत्याने विकासाचे इंजिन पुढे न्याल हीच अपेक्षा व्यक्त केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here