जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

0
12

कर्णबधिर विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वस्तूंचे वाटपः प्रतिक राणे, रामचंद्र सावंत मित्रमंडळाचा पुढाकार..

सावंतवाडी, दि-११: जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते,कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने माऊली कर्णबधिर विद्यालय आरोस, दांडेली व दयासागर छात्रालय, विद्यार्थ्यांचे वसतीगृह रोणापाल येथे विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वापरातील वस्तू, मुलांकडून केक कापून व खाऊचे वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे उपसंपादक प्रतिक राणे, माजी मुख्याध्यापक आबाजी सावंत – भोसले, तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत, युवा कोकणचे संपादक प्रथमेश गवस, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उर्फ धर्णे आदी उपस्थित होते.
कर्णबधिर विद्यालय आरोस, दांडेली येथील मुलांनी सीताराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ग्रिटींग कार्ड देऊन शुभेच्छा दिल्या तर दयासागर छात्रालय, विद्यार्थ्यांचे वसतीगृह रोणापाल यांच्या कडून देखील श्री गणेश स्तोत्र म्हणून गणराया कडे सीताराम गावडे यांच्या दिर्घायुष्य व चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here