भाजप चे विजयी उमेदवार नितेश राणे यांची कणकवली शहरातून भव्य विजयी मिरवणूक..

0
12

फटाक्याची आतशबजी, कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोषाल रॅली..गुलाबाची केली उधळण

कणकवली,दि.२३: भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचंड मताधिक्याने झालेल्या विजयानंतर कणकवली शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली. भाजप कार्यालय ते नरडवे नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड मार्गे आप्पासाहेब पटवर्धन चौक मधून बाजारपेठेत झेंडा चौक, ढालकठी कडून पटकेदेवी कडे ही विजय मिरवणूक निघाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, त्याचप्रमाणे डीजे आणि डॉल्बीचा नादावर ही रॅली काढण्यात आली.
यावेळी आप्पासाहेब पटवर्धन चौकातील मुख्य चौकात दोन जेसीबी वरून फुलांचा फुलांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे फलक उंचावत जनतेचे आणि सर्व नेत्यांच्या आभार मानले.
आमदार नितेश राणे यांच्या विजयानंतर कणकवलीत जल्लोष साजरा करण्यात आला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार नितेश राणे यांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर काढण्यात आली. यावेळी गुलाल उधळत आणि जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आमदार नितेश राणे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावा राहिला नाही. गुलाल उधळत सर्वत्र वातावरण गुलाबी करण्यात आले होते.यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर कणकवली येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सजलेल्या गाडीमध्ये आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी सभापती मनोज रावराणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक ,माजी उपसभापती संतोष कानडे, महेश गुरव ,भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, देवगड येथील योगेश चांदोस्कर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी विजयाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. कार्यकर्ते बेभान होऊन आनंदोत्सव साजरा करत होते. डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. आमदार नितेश राणे हे हात उंचावून अभिनंदन आजचा स्वीकार करत होते. आमदार नितेश राणे यांच्या या विजय मिरवणुकीने वातावरण दुमदुमून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here