शितल तावडे यांच्या प्रवेशामुळे शिरगाव मध्ये भाजपाला बळकटी
कणकवली,दि.२६: आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उ.बा.ठा पक्षाच्या शिरगांव ग्रामपंचायत सदस्य शीतल तावडे,गुरुनाथ तावडे,प्राची तावडे,यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.
या भागाचा विकास करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी लाखो रुपयांचा निधी आणला. त्यामुळे या भागाचा विकास आमदार नितेश राणे करू शकतात. हे लक्षात आल्याने आपण भाजपा मध्ये आल्याचे तावडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष राजू शेट्ये, युवक सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम व अन्य अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.