भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र माडखोल येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

0
22

सावंतवाडी,दि.१५: जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारत भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आपला वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमातून साजरा केला आहे.
कोणताही जल्लोषी कार्यक्रम न करता साधेपणाने जनहिताचे विविध उपक्रम या दिवशी केले जात आहेत. दरम्यान आज माडखोल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी विशाल परब यांच्या समवेत येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊत, संजय राऊळ, जी जे राऊळ, दत्ताराम राऊळ, केतन आजगावकर, पप्पू गावडे, स्वप्निल राऊळ, बंटी सावंत,रवी चव्हाण, सायली शिरवणकर, निशा शिरवणकर, श्रेया पानोलकर, तेजस्विनी पानोलकर, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मान्यवरांसह प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर वर्ग, नर्स, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here