भाजपच्या मळगाव सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला

0
22

फोडाफोडीचा डाव फसल्याने ठराव दाखल करणारे विरोधकच गैरहजर

सावंतवाडी,दि.१४: भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या मळगांव ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यावर विरोधकांकडून दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मतदाना आधीच बारगळला. भाजपच्या काही सदस्यांच्या मनात गैरसमज निर्माण करून देत त्यांना हाताशी धरून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांचा डाव असफल झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदर सदस्यांची भेट घेत चर्चा करत वस्तुस्थिती समजून दिल्याने त्यांचे मन परिवर्तन झाले त्यामुळे विरोधकांचे सत्ता पलटविण्याचे मनसुबे उधळले गेले.
भारतीय जनता पार्टीचे मळगाव येथील प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याविरोधात केसरकर समर्थक असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. भाजपच्या एका सदस्य महिलेच्या भोळेपणाचा फायदा घेत तिच्या मनात सत्ताधाऱ्या विरोधात गैरसमज निर्माण करून देत तिला हाताशी धरून ग्रामपंचायत ची सत्ता काबीज करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, भाजपचे माजी सभापती राजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांची भेट घेत मनातील गैरसमज दूर केले. त्यानंतर आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी सांगत ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा शब्द दिला. याच बरोबर विरोधकांपैकी एक सदस्य देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती.
सोमवारी दुपारी ४ वाजता मळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत या अविश्वास ठरावावर मतदार होणार होते. मात्र, ठरावाच्या बाजूने आवश्यक असलेले सदस्यांचे संख्याबळ जमत नसल्याने व आपला डाव फसल्याचे लक्षात येताच अविश्वास ठराव आणणारे विरोधक गैरहजर राहिले. त्यामुळे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी हा अविश्वास ठराव फेटाळला असल्याचे जाहीर केले.
यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला. तसेच सरपंच हनुमंत पेडणेकर यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी
माजी सभापती राजेंद्र परब ,
माजी सभापती पंकज पेडणेकर,आंबोली मंडळ सरचिटणीस प्रमोद गावडे ,
तळवडे शक्ती केंद्र प्रमुख दादा परब ,माजी सरपंच स्नेहल जामदार ,माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर ,माजी सरपंच निलेश कुडव , ग्राम पंचायत सदस्या सौ.निकीता राऊळ , सौ. अनुजा खडपकर,
शक्ती केंद्र प्रमुख निळकंठ बुगडे,भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव,
बुथ अध्यक्ष एकनाथ गावडे,
एकनाथ खडपकर,भगवान रेडकर, प्रकाश जाधव, सुखदेव राऊळ,रुपेश सावंत,
निलेश राऊळ,निळकंठ नागडे,आदेश परब,दीपक जोशी,उदय जामदार,
राजन जाधव,विश्वनाथ गोसावी यांच्या सहभाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधकांनी राजकारण करून भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेली ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन तसेच सहकारी सदस्यांनी दाखविलेला विश्वास यामुळे विरोधकांचा डाव हाणून पाडण्यात यश आले. पक्षाची एकजूट या निमित्ताने दिसून आली. यापुढे मळगाव गावाच्या विकासासाठी अधिक ताकतीने काम करणार अशी प्रतिक्रिया यावेळी सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी दिली. तर विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना केसरकर समर्थक ग्रामपंचायत सदस्यांकडून जे राजकारण खेळले गेले ते चुकीचे आहे त्यामुळे महायुतीला तडा जाण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असून या विषयी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत असे मत यावेळी माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here