सावंतवाडी,दि.२९: तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी येथील शिक्षक रामचंद्र शिवराम घावरे यांना राज्यस्तरीय २०२४ चा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
आज रविवार २९ सप्टेंबर रोजी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सावंतवाडी नवसरणी येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली होती, यावेळी श्री घावरे यांना शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत हा पुरस्कार देण्यात आला.
श्री घावरे हे वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबाबत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोखले, वैभववाडी क्रीडाशिक्षक उर्दू हायस्कूल श्री जमादार “न्यू” इंग्लिश स्कूल हेट श्री आडे, श्री घावरे यांच्या पत्नी शिरशिंगे माजी सरपंच सौ.रेखा घावरे,आई जयश्री घावरे, जीवन लाड, ग्रामपंचायत माजी सदस्य संदीप राऊळ,विश्राम वारंग,विशाल घावरे, विशाल सावंत तसेच शिरशिंगे गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.