मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात..

0
26

सावंतवाडी,दि.०२: तालुक्यातील चराठे गावठणवाडी येथील शेतकरी यशवंत गणपत बिर्जे यांच्या अतिवृष्टीमुळे रहात्या घराची भिंत कोसळून स्वतः यशवंत बिर्जे व त्यांचा इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला मुलगा कु.गणपत बिर्जे मातीच्या ढिगा-याखाली सापडून जबर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगा-याखालून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या यशवंत बिर्जे यांना तातडीची मदत म्हणुन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यानी त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,तालुका प्रमुख नारायण राणे,उपतालुका प्रमुख संजय माजगांवकर, माजगांव विभागप्रमुख उमेश गांवकर,कोलगांव विभागप्रमुख महेश ऊर्फ पप्पू सावंत,सरपंच सौ.प्रचिती कुबल, उपविभाप्रमुख राजु कुबल,चराठा शाखाप्रमुख राजन परब, कुणकेरी शाखाप्रमुख नारायण सावंत, बुथप्रमुख प्रशांत बिर्जे,उमेश परब व ग्रामस्थ यानी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here