विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी

0
17

व्हाईसचेरमन पदी सौ साक्षी गावडे

सावंतवाडी,दि.०२: विलवडे येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलवडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप दळवी यांची तर व्हाईसचेरमनपदी सौ साक्षी विलास गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणुन आर आर आरावंदेकर यांनी काम केले.
यावेळी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी यांची तर व्हाईसचेरमनपदी सौ साक्षी विलास गावडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल या दोघांचे सरपंच प्रकाश दळवी आणि पतसंस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन प्रदीप दळवी आणि व्हाईसचेरमन साक्षी गावडे यांनी पतसंस्थेच्या आर्थिक उन्नतीसह पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी विशेष योजना राबवण्यात असल्याचे सांगितले.
यावेळी पतसंस्थेचे संचालक तथा माजी चेअरमन विलास गावडे, बाळकृष्ण दळवी, राजाराम दळवी, भागू लांबर, बुद्धभूषण हेवाळकर, प्रफुल्ल सावंत, पतसंस्थेचे व्यवस्थापक सोनू दळवी, लिपिक सदाशिव दळवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here