सावंतवाडी,दि.३१ : भाजपा युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेच्या स्वच्छ्ता दूतांना त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी हातमोजे आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले.
सावंतवाडी शहर स्वच्छ ठेवण्यामागे स्वच्छता दूतांचा मोठा वाटा आहे. सावंतवाडीत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
या पावसात काम करणे खूप कठीण आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चांगला रेनकोट आणि हातमोजे असणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेउन संदीप गावडे यांनी वाढदिवसानिमित्त सर्व स्वच्छता दूतांना रेनकोट आणि हात मोजांचे वाटप केले. तसेच त्यांनी स्वच्छता दूतांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी अनिकेत आसोलकर, दीपेश शिंदे, अभिषेक लाखे तसेच नगरपालिका कर्मचारी, सर्व स्वच्छता दूत उपस्थित होते.