सावंतवाडी,दि.३०: निगुडे मार्गे सोनुर्ली एसटी बस सेवा पूर्ववत करा तसेच सकाळी बांदा निगुडे मार्गे मडुरा सकाळी ०९:३० ची हायस्कूलच्या विद्यार्थीची बस नियमित वेळेवर करा अशी मागणी त्यांनी सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनात समीर गावडे यांनी असे म्हटले आहे की निगुडे सोनुर्ली बसची मागणी कित्येक वेळा करण्यात आली परंतु सदरची फेरी चालू करण्यास विलंब का..? सदरची एसटी बस १० जुलै पर्यंत पूर्ववत करा त्याच प्रमाणे इतर बस सकाळी ०९:३० हायस्कूल मडुरा जाणारी बस नियमित वेळेत येत नसून सकाळी ०९:३० निगुडे येथे न येता १०:३० वाजता येते. पावसाळ्यात बस वेळेत न आल्याने विद्यार्थी शाळेत वेळेत न पोहचु शकल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जर बसचे पास वेळेवर काढूनही बसेस वेळेवर येत नाही याविषयी आपल्या वाहन चालकांना तसे आदेश द्या. दुपारी १२:३० बांद्यावरुन निघणारी बस स्थानकापासून उशीरा निघते त्यामुळे या सर्व घटनेची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच निगुडे सोनुर्ली मार्गे सावंतवाडी रेल्वे स्थानक व रेल्वे स्थानक ते सोनुर्ली निगुडे मार्गे बांदा अशी बससेवा पूर्ववत करा अन्यथा १० जुलै नंतर आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही श्री. गावडे यांनी आगार व्यवस्थापक श्री. गावित यांना दिला. यावेळी निगुडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर जाधव उपस्थित होते.