आपली संस्कृती आणि परंपरा जपली पाहिजे – भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब

0
24

जिल्ह्यातील काही दशावतार नाट्य मंडळींनी घेतली श्री परब यांची भेट

सिंधुदुर्ग,दि.१७: तळकोकणची ओळख असणारे दशावतार हा खरा तर कोकणचा आत्मा! ही आपली संस्कृती, हा आपल्या जगण्यातील गाभा! हे सारे जपले पाहिजे,आणि महत्वाचे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले पाहिजे.

आज जिल्ह्यातील दशावतार नाटक करणाऱ्या मंडळींनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेत आपले विविध प्रश्न मांडले. यावेळी परब यांनी त्यांचे असणारे प्रश्न जाणून घेत येत्या काळात त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांना दिला. दशावतार नाटक करणाऱ्या मंडळींनी ३० तारखेला असणाऱ्या कार्यक्रमाचे देखील त्यांना निमंत्रण दिले.

यावेळी अंकुश जाधव, सुभाष लोंढे, विलास गवस, कृष्णा नाईक, प्रभाकर गवस, प्रेमानंद ठाकूर, विश्वनाथ गवस, शंकर जाधव, उदय गवस, आदित्य गवस, अभिमन्यू बांदेकर, गुणाजी कदम, कृष्णा कुंभार, अजिंक्य गवस, देवेंद्र भैरवकर, नारायण गवस, राजन बांदेकर,मधुसूदन गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here