देवगड,दि.१४: मुक्तद्वार सागर वाचनालय (रजि.) तांबळडेग येथे स्वातंत्र्यसैनिक व साहित्यिक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी यांच्या प्रतिमेला ग्रंथालय अध्यक्ष दिगंबर येरागी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तर ग्रंथालय अंतर्गत हिशेब तपासणीस विष्णू धावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले,महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रंथालयाच्या वतीने शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा तांबळडेग येथील परिसरात सेवानिवृत्त सहाय्यक लागवड अधिकारी देवानंद केळुसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मुक्तद्वार सागर वाचनालय (रजि.) तांबळडेग अध्यक्ष दिगंबर येरागी,उपाध्यक्ष प्रभाकर राजम, सचिव रामचंद्र सारंग, देवानंद केळूसकर,वामन मोंडकर,विष्णू धावडे,नाना निवतकर, आकांक्षा सारंग,कृष्णा सनये, ग्रंथपाल भावना मालडकर,लिपिक समृद्धी धुरी,दिपक कांदळगावकर,अमित केळूसकर,शिवम कोळंबकर,माधवी प्रभू आदी उपस्थित होते.