सावंतवाडी,दि.२३ : येथील युवा उद्योजक तथा महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या सौजन्याने तसेच अमित परब यांच्या पुढाकारातून चराठा येथील नागरिक आज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले आहेत.
दरम्यान आज सकाळी नारळ फोडून स्वामींचे स्मरण करून विशाल परब यांनी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी श्रीफळ फोडून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभल्यामुळे मी माझ्या जीवनात उत्कर्ष करू शकलो त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहूदे अशी प्रार्थना देखील श्री. परब यांनी यावेळी केली.