सावंतवाडी,दि.२३: ग्रामस्थांनी ठरवलं तर खूप काही होऊ शकतं म्हणून म्हटलं गाव करेल ते राव करेल का..? कलंबिस्त येथील ग्रामस्थ एकत्र आले आणि आपल्या गावातील स्मशानभूमी स्वच्छ करायची या हेतूने श्रमदानातून स्मशान भूमी स्वच्छ सुंदर केली आहे. एखाद्या गावातील मशानभूमी स्वच्छ करण्याचे अनोखा असा उपक्रम या ग्रामस्थांनी घालून दिला आहे माजी सैनिक संदीप सावंत यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमी स्वच्छ सुंदर करण्याचे ठरले आणि एक दिवस रविवार स्मशानभूमी स्वच्छ परिसर सुंदर परिसर बनवण्यासाठी हे सर्व ग्रामस्थ तरुण एकवटले आणि सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ सुंदर परिसर करून ठेवला स्मशानभूमीत लागणारी लाकडे तसेच सर्व सुविधा उत्तम प्रकारे करून ठेवण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी श्रमदानातून काम केले यामध्ये माजी सैनिक प्रकाश सावंत,माजी सैनिक संदीप सावंत, माजी सैनिक उत्तम सावंत, माजी सैनिक रामू सावंत,अनिल सावंत, रमेश सावंत, बाळा राजगे, शेखर मेस्त्री, कृष्णा सावंत,अनिल सावंत, आदी ग्रामस्थ एकत्र येत एक दिवस स्वच्छतेसाठी असा उपक्रम राबविला आहे. गावात प्रत्येक सामाजिक स्थळे स्वच्छ सुंदर परिसर बनविण्याच्या दृष्टीने या ग्रामस्थांच्या टीमने उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. कलंबिस्त गावात असा उपक्रम राबवल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.