कणकवली,दि.१०: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जाऊन युवा उद्योजक तथा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी श्री राणे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना श्री परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे माझे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचे सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रात तसेच कोकणच्या विकासात श्री राणे यांचा मोलाचा वाटा आहे. अशा या कर्तृत्ववान व्यक्तींचा आज वाढदिवस असून त्यांना उत्तम,निरोगी, दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करत विशाल परब यांनी राणे कुटुंबीयांवर असलेली आपली निष्ठा व्यक्त केली.
यावेळी श्री परब यांच्यासोबत प्रथमेश कामात, प्रशांत पाटील, ओकार पावसकर, नयन गुरव, प्रसन्ना गंगावणे, प्रकाश मोर्ये, केतन आजगावकर,तेजस माने, चेतन जगदाळे आदी उपस्थित होते.