कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांची चमकदार कामगिरी

0
90

विविध ४८ पदके पटकावत यशाची परंपरा ठेवली अबाधित….

सावंतवाडी,दि.०७ : येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा सावंतवाडी अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा- २०२४ या जिल्ह्यातील मानांकित स्पर्धा परीक्षेमध्ये सुवर्णपदक,रजतपदक तसेच कांस्य पदकांची कमाई करत यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे.
संदेश सावंत मित्र मंडळ, सांगवे-कणकवली यांच्या वतीने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेसाठी कळसुलकर प्राथमिक शाळेचे अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. इयत्ता दुसरी ते चौथी मधून सुवर्णपदक विजेते विद्यार्थी-१३, रौप्य पदक विजेते विद्यार्थी-१६ ,कांस्यपदक विजेते विद्यार्थी- १९ अशा प्रकारे विविध पदांची कमाई करत जिल्ह्यामध्ये ४८ पदकांची कमाई करून गुणवत्ता पूर्ण शाळा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. यामध्ये सुवर्णपदक विजेते- (इयत्ता दुसरी) धारा कोरगावकर, अवनी आवटे, निधी गवस,कृष्णा पायशेठ, चैतन्य सावंत, वेद गवस, तिसरी- देवाशिष फाले, श्रीकर शुक्ल, आरुष नाईक, कुश राऊळ, अंश सावंत, अथर्व लाड, शिवम बरुड. रौप्य पदक विजेते- (दुसरी) गार्गी पई, रत्नाराम रबारी,चैत्राली काळे, कौस्तुभ पास्ते. (तिसरी) साईराज पैइ,त्रिवेणी सुकी, अर्णव काकतकर,परिधी शिंदे,सुधांश सहानी, चौथी- अभिराज सावंत तनिष्क सानप,विनीत कदम, आर्या मोर्ये,हार्दिक वरक,आरुष परब, भरत सावंत, कांस्यपदक विजेते-(दुसरी) श्रेष्ठ कडव, अर्णव कोरगावकर, शौर्य अपराध,सार्थक वरक,तिसरी- लीना बांदेकर, सार्थक बंगाळ, अमेय तामाणेकर, आराध्य राऊळ, उमेद सावंत, सर्वेश भिसे,प्रणव बरागडे, आराध्य नाईक. चौथी-श्रुती सावंत, मनस्वी बांबुळकर,समृद्धी होडावडेकर,तन्मय कांबळे, अद्वैत पाथरवट, दीप राऊळ, ओम गवस या विद्यार्थ्यांनी विविध पदकांची कमाई करत घवघवीत यश प्राप्त केले आहे. ज्ञान, कला, क्रीडा या क्षेत्रात या शाळेचा उज्वल यशाचा दबदबा कायम राहिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई,सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर सर्व पदाधिकारी, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मानकर सर समस्त शिक्षकवर्ग, केंद्रप्रमुख सावंतवाडी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ पदाधिकारी, पालकवर्ग, हितचिंतक, माजी विद्यार्थी या सर्वांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेच्या या यशाबद्दल सावंतवाडी शहर परिसर,व सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. प्रविष्ट तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक प्रदीप सावंत, डी.जी वरक, अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ, श्रीमती प्राची बिले, श्रीमती स्वरा राऊळ, श्रीमती संजना आडेलकर, श्रीमती स्मिता घाडीगावकर आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here