सावंतवाडी,दि.२१: तालुक्यातील तळवडे येथे बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास माजी सरपंच कृष्णाजी पांडुरंग रेडकर यांच्या घरासमोरील शेडला अचानक आग लागली. या आगीत त्यांचे किरकोळ नुकसान झाले होते. तळवडे येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या युवा उद्योजक विशाल परब यांनी ही घटना समजताच घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
विशेष बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रसंगी रेडकर कुटुंबियांना आधार देत आपुलकीने संवाद साधला.
