सांगेली आरोग्यवर्धिनी केंद्र येथे उपचार सुरू..
सावंतवाडी,दि.०८: तालुक्यातील सांगेली येथील श्री जवाहर नवोदय विद्यालयातील सुमारे ४३ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असल्याची घटना आज घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना आज पहाटे तीन वाजल्यापासून संडास आणि उलटी होऊन पोटात दुखू लागल्याने मुलांनी याबाबत विद्यालयातील मुख्याध्यापक यांना सांगितल्यानंतर मुख्याध्यापकांनी सांगेली आरोग्य केंद्र प्रशासनाला कळविले, त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत कर्मचारी शैलेश राऊळ यांनी रुग्णवाहिका घेऊन आज सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून जवळपास ४३ विद्यार्थ्यांना आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी प्रिंशा महिजन पी.पी यांनी तात्काळ उपचार सुरू केले यावेळी त्यांना विचारलं असता रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आता काही प्रमाणात विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत, या कामात त्यांना सिस्टर लक्ष्मी कडे यांनी मदत केली.
दरम्यान घटनास्थळी बिट हवालदार संतोष गलोले व श्री काळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सामाजिक कार्यकर्ते वामन नार्वेकर, शाहू पास्ते आदी पालक उपस्थित होते.