अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे आयोजित कुडाळ येथील गायन परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले सुयश.

0
76

कुडाळ,दि.११: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे आयोजित केलेल्या कुडाळ येथील गायन परीक्षेत स्टेपिंग स्टोन स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. या गायन परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता ४ थी तील विद्यार्थिनी ‘ कु. मानव प्रसाद साळगावकर ‘ हिने प्रवेशिका गायन पायरीत प्रथम श्रेणी प्राप्त केली. तर, इयत्ता ३ री तील विद्यार्थिनी ‘ कु. गिरिजा सागर चव्हाण ‘ हिने प्रारंभिक गायन पायरीत द्वितीय श्रेणी प्राप्त केली.
राधाकृष्ण संगीत विद्यालयाच्या संचालिका वीणा दळवी यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे शाळेचे संस्थापक रुजुल पाटणकर व शालेय गायन शिक्षक कपिल कांबळी यांनी या विद्यार्थिनींचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here