कलंबिस्त हायस्कूलमध्ये १० फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिर…

0
106

कलंबिस्त ग्रामपंचायत, दुग्ध संस्था व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

सावंतवाडी,दि.०७: तालुक्यातील कलंबिस्त ग्रामपंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त तसेच जिल्हा रुग्णालययाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी १० फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कलंबिस्त हायस्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित राहणार असून यामध्ये नेत्रचिकित्सक सर्जन, स्त्रीरोग तज्ञ ,बालरोग तज्ञ,आदी तज्ञ डॉक्टर येऊन तपासणी करणार आहेत. तसेच यादरम्यान आयुष्यमान कार्ड ही काढले जाणार आहे. या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व रुग्णांची मोफत तपासणी तसेच औषधोपचार ही दिले जाणार आहेत.
तसेच रुग्णांसाठी वेगवेगळ्या विभाग तपासणीसाठी असणार आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची तपासणी केली जाणार असुन हिमोग्लोबिन रक्त तपासणी आधी सर्व तपासण्याही केल्या जाणार आहेत गंभीर आजार असलेल्या रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखलाही करण्याची व्यवस्था ही केली जाणार आहे.
या पंचक्रोशीत असे पहिल्यांदाच महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे जवळपास आठ तज्ञ डॉक्टर नर्सेस आदी जिल्हा रुग्णालयाचा स्टाफ असणार आहे.
जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर दिगंबर करंबळेकर व सर्जन डॉक्टर श्याम राणे, नेत्रचिकेचा चेतन कोरे, केतन कदम, स्वाती रावले, संदीप मोहाड, संगीता कोरे, संतोष देसाई, तृप्ती जाधव, नेहा पडते, श्रद्धा सावंत, प्रियंका राऊत, प्रशांत जाधव, दशरथ गोसावी आदी या शिबिरात उपस्थित राहून तपासणी करणार आहेत.तरी कलबिस्त गावातील व आजूबाजूच्या गावातील लोकांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित रहावे. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी नऊ ते दहा या वेळेत होणार आहे या उद्घाटनासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ तसेच कलंबिस्त संस्थेचे पदाधिकारी गावातील प्रमुख ग्रामस्थ आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आधी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड.संतोष सावंत व सचिव रमेश सावंत आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here