सावंतवाडी,दि.०६: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोलीद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा २०२३-२४. या स्पर्धेमध्ये सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेचा विद्यार्थी कुमार अमूल्य अरुण घाडी (इयत्ता नववी) याने सहावा क्रमांक पटकावला असून त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव केला व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो , पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ, क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.