होडावडे चावडी स्वच्छता मोहीम

0
61

होडावडे दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या तर्फे रबविली यशस्वी स्वच्छता मोहीम..

सिंधुदुर्ग,दि.२९: रविवार २८ जानेवारी २०२४ रोजी होडावडे गावातील न्हईवाडी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम रबविण्यात आली.
ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या होडावडे चावाडीच्या वास्तू दुर्लक्षामुळे वर व सभोवताली झाडे व झुडपे वाढल्यामुळे दिसेनाशा झालेल्या होत्या.
येथील दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून जुन्या वास्तूच्या ज्योत्या व समाध्या या ठिकाणी वाढलेली झाडी तोडून या वास्तू मोकळ्या करण्यात आल्या.
या स्वच्छता मोहिमेत चंद्रकांत दळवी, आत्माराम दळवी, गुरुनाथ दळवी, सुरेश दळवी, संजय दळवी, शामसुंदर दळवी, दिलीप दळवी, रामचंद्र दळवी, मनोहर दळवी, अरुण दळवी, रामचंद्र दळवी, राजन दळवी, महेश दळवी, यशवंत दळवी, रामकृष्ण दळवी, ज्ञानेश्वर दळवी, रमाकांत दळवी, विष्णू दळवी, सुरेश मेस्त्री, अंकुश दळवी, दशरथ दळवी, सुजल दळवी, सत्यवान दळवी, लक्ष्मण दळवी, विष्णू दळवी, उदय दळवी, श्रीधर दळवी, गोटया दळवी, गुणाजी दळवी, राजन दळवी, राघोबा दळवी, शाम दळवी, प्रताप दळवी, तुकाराम दळवी, पांडुरंग दळवी, मनोहर दळवी, विलास दळवी आदी दळवी समाज बांधव तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, पंकज गावडे, रोहन राऊळ, साईप्रसाद मसगे, विशाल परब, ज्ञानेश्वर राणे आदी मावळे उपस्थित होते.
उपस्थितांना चंद्रकांत दळवी, महेश दळवी, विलास दळवी यांनी अल्पोपहार व जेवणाची सोय केली. सर्व उपस्थितांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here