..तर सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अभिषेक सावंत
सावंतवाडी,दि.२१: अखिल भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सावंतवाडीत बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष ऍड.सुहास सावंत यांनी नूतन पदाधिकारी जाहीर केले.
यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी सिताराम गावडे तर सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अभिषेक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलतांना सीताराम गावडे यांनी तालुकाध्यक्षाची धुरा सांभाळल्यापासून मोठ्या प्रमाणात संघटना वाढीचे काम केले. त्यामुळे त्यांना पदोन्नती देण्यात आली असल्याचे यावेळी श्री सावंत यांनी सांगितले.
यावेळी अभिषेक सावंत, प्रसाद राऊळ,पुंडलिक दळवी,प्रशांत ठाकुर,अविनाश राऊळ,सीताराम गावडे,प्रसाद परब,लक्ष्मण पाटकर, आनंद नाईक,बाळकृष्ण नाईक, मनोज घाटकर, विशाल सावंत,संदीप गवस, शिवदत्त घोगळे, अनिल ठिकार, संजय लाड,विजय देसाई,अभिमन्यू लोंढे, सुधीर राऊळ,आनंद राऊळ,आनंद धोंड,संतोष सावंत आदी उपस्थित होते.