“जल्लोष रामलल्ला”च्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “रिल्स” स्पर्धेचे आयोजन…

0
91

ओंकार कलामंचाचा पुढाकार; ५ हजाराचे पहिले बक्षिस, सहभागी होण्याचे आवाहन…

सावंतवाडी,दि.२०: ओंकार कलामंचाच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर “रिल्स” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम वाचन मंदिराच्या समोर होणार्‍या जल्लोष रामलल्लाचा या कार्यक्रमाचे व्हिडीओ त्यात असणे बंधनकारक असणार आहे. या स्पर्धेअंतर्गत कार्यक्रमाची रिल्स तयार करणार्‍या स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. वेशभुषा अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय अशी ३ हजार, २ हजार आणि १ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान रिल्स स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही संबंधितांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येवून रिल शुट करायची आहे. तसेच ही रिल २६ जानेवारी पर्यंत ओंकार कलामंचाच्या ‘omkar_kalamanch’ या इंस्टाग्राम आयडीवर मेन्शन करावी, बनवलेली रिल ३० सेंकदापेक्षा जास्त असू नये, सहभागी इच्छिणार्‍या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी सिध्देश सावंत-: 9130582166 , नितेश देसाई:- 8275211126 यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन ओंकार कला मंचचे अध्यक्ष अमोल टेंबकर व अनिकेत आसोलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here