सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय..
सिताराम गावडे करणार नेतृत्व.
सावंतवाडी,दि.१९ : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. येत्या २६ जानेवारीला ते मोठे आंदोलन मुंबई येथे करणार आहेत. दरम्यान जरांगे पाटलांच्या या लढ्याला यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुका मराठा समाज मुंबई येथे रवाना होणार असून मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबईत उपस्थित होणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी दिली आहे.
आज शहरातील आरपीडी हायस्कूल येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीस सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, सुंदर गावडे,आकाश मिसाळ, प्रथमेश पनासे, नितीन गावडे, महादेव सावंत, विजय देसाई,दीपक गावकर,राजू तावडे,दिगंबर नाईक, प्रसाद राऊत, पुंडलिक दळवी, प्रवीण भोसले, उमाकांत वारंग, विलास जाधव, अभिषेक सावंत, अभिमन्यू लोंढे,प्रा.रुपेश पाटील,आनंद धोंड,मनोज घाटकर,गोविंद सावंत,भिकाजी धोंड,शिवदत्त घोगळे आदी उपस्थित होते.



