… अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण छेडणार
सावंतवाडी,दि.०९: तालुक्यातील विलवडे येथे दिनांक २३ जुलै २०२१ रोजी महापूर सदृश्य नदीचे पाणी भिलवडे येथील घरामध्ये शिरून १५० घरांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले ही नुकसान भरपाई अजून पर्यंत पूरग्रस्तांना मिळालेले नाही. यासंदर्भात सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची आज मनसेच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली व निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले की, काही घरे पूर्ण जमीनदोस्त झालेली असून ते बेघर झालेले आहे. तर महापुराचे पाणी घरात घुसल्याने बहुसंख्य ग्रामस्थांना वर्षभराचा अन्नसाठा, कपडालता, भांडीकुंडी, टीव्ही, फ्रिज, वगैरे इलेक्ट्रिक सामानाची पूर्णपणे नुकसान झालेले असून काही शेतमांगर पडून त्यातील शेतीचे अवजारे, गुरांचे गवत यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विलवडे येथील वरचीवाडी, पिसुळणे,मळावाडी,टेमवाडी येथे नदीच्या प्रवाहाने मार्ग बदलल्याने वहाळाला महापूर सदृश्य पाणी आल्याने दोन्ही ठिकाणावरून सदरचे पाणी गावात घुसल्याने आम्हा शेतकऱ्यांच्या भात शेतीचे, केळी बागायतीचे, कणगर शेतीचे, भाजीपाल्याच्या शेतीचे लाखों रुपयांची नुकसानी झालेली आहे. सदर पुरात विलवडे येथील शेती पंपाचे, तसेच शेती पंपाच्या मोटर त्याचप्रमाणे घरातील दुचाकी, चार चाकी वाहने यांची यांचे नुकसान झालेले आहे. भिलवडे गावातील जवळजवळ १५० कुटुंबे पूर बाधित झालेले असून त्यापैकी ५५ कुटुंबांची घरे, दुकाने, मांगर बाधित झालेली आहेत तर १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची कनगर, भात शेतीचे केळी, बागायतीचे नुकसान झालेले आहे. परंतु शासनाने केलेल्या पुरबादीत कुटुंबाच्या यादीत फक्त ३५ कुटुंबाचा समावेश केलेला असून आमची सुमारे१२५ कुटुंबे शासनाच्या अन्नधान्य व इतर मदतीपासून गेली अडीच वर्षे वंचित राहिलेली आहेत. विलवडे गावातील पूरबाधितांच्या यादीत ग्रामस्थांच्या वर्षभराचा अन्नसाठा आणि इतर गोष्टीची मोठी हानी झाली. त्यामुळे आमची कुटुंबे शासनाच्या मोफत अन्नधान्य, केरोसीन, तूरडाळ व अन्य मदतीपासून वंचित राहिलेली आहे. त्यामुळे अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या आमच्या कुटुंबाच्या पूरग्रस्तांच्या यादीत समावेश करून संदर्भीय शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला विनविलंब प्रतिक कुटुंब ४० किलो अन्नधान्य, गहू व तांदूळ ०५ लिटर केरोसीन, पाच किलो तूरडाळ व अन्य लाभ दिनांक २५/०१/२०२४ पूर्वी न दिल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी २०२४ ठीक ०८:०० रोजी तहसील कार्यालय सावंतवाडी येथे उपोषणास बसणार आहोत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील. असं सदर निवेदनात पूरग्रस्तांनी म्हटलेला आहे यावेळी मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, विभाग अध्यक्ष विष्णू वसकर, विजय बांदेकर तसेच पूरग्रस्त श्रीराम सावंत, अरुण दळवी, विजय दळवी, विश्राम दळवी, पांडुरंग दळवी, यशवंत दळवी, प्रभाकर दळवी, विष्णू दळवी, नंदकिशोर दळवी, नरेंद्र दळवी, यशवंत लक्ष्मण दळवी, रवींद्र सावंत, लक्ष्मण सावंत, बाबाजी दळवी, सखाराम सावंत, सखाराम दळवी, दिगंबर दळवी, संतोष दळवी, सिताराम दळवी सत्यवती सावंत, भरत सावंत, बाबुराव सावंत, सोनू दळवी, श्रावण दळवी, प्रतिभा दळवी,उत्तम दळवी, सुकाजी दळवी, विष्णू सावंत, संभाजी दळवी, प्रभावती दळवी, जितेंद्र दळवी, गोपाळ दळवी, निशा दळवी, रत्नमाला दळवी, परशुराम दळवी, सुचिता दळवी, विलास दळवी, सुरेश दळवी, आदी पुरग्रस्तांनी सदर निवेदनावर सही केलेली आहे. व सदर पूरग्रस्त २६ जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी या ठिकाणी उपोषणास बसणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदर पूरग्रस्तांच्या बाजूने आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अन्य गावातील पूरग्रस्तांना ज्या कुटुंबांना पूरग्रस्त म्हणून मदत मिळाली. नाही त्यांनीही या उपोषणास बसुन आपल्या मागण्या ही संदर्भात कार्यवाही का करण्यात आली नाही याचा जाब शासनाला विचारावा. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले.