सावंतवाडी,दि.३०: सन २००० साली स्थापन झालेली व अपंगांनी अपंगासाठी चालवलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना. या संघटनेच्या सन २०२३ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी भोमवाडी-आजगांवचे बाळासाहेब आबाजी पाटील यांची मुंबई दादर येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य सचिव पदी पाच वर्षासाठी महासंघाच्या नुतन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.मेधाताई काळे व सर्व संचालकानी सर्वानुमते निवड केली.
बाळासाहेब पाटील हे गेली १८ वर्षे राष्ट्रीय अपंग विकास महासंघात कार्यरत आहेत. महासंघाने अपंगांच्या न्याय हक्कासाठी राज्यभर प्रचार व प्रसार करून अपंगांसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर विविध आंदोलने व आझाद मैदान येथे धडक मोर्चा व जेलभरो आंदोलन केले. ज्यामध्ये एस, टी प्रवासात ७५% सवलत, अपंग वित्त व विकास महामंडळ उभारनी, अपंगांचा नोकरीतील बॅकलॉग भरून काढने, उच्च न्यायालयाच्या माध्यमातून अपंग कृती आराखड्याची अंमलबजावनी, अपंगानां ग्राम पंचायत / पंचायत समिती/जिल्हा परिषद / नगरपालीका/इत्यादी ठीकानी ५% निधिची तरतुद, अशा अनेक मागण्या महासंघाच्या माध्यमातून आंदोलने व निवेदने देऊन व त्याचा पाठपुरावा करून मान्य करून घेतल्या. अशाप्रकारे तळागाळातील अपंगापर्यंत शासनाच्या योजना पोहचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम महासंघ गेली २३ वर्षे अत्यंत यशस्वीपने करत आहे.
श्री. पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात खासकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपंगांच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी सतत प्रामाणिकपणे कार्य करत आहात, यामध्ये आपण विविध दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जवळपास १२०० अपंग व्यक्तींना ३५ लाख रूपयांचे कृत्रीम साहित्य मोफत वाटणतयात महत्वाचा सहभाग व पुढाकार घेऊन यशस्वीपने राबवलात. या मध्ये तसेच स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाचे औचित्य साधून कोल्हापूर व सिंधुदुर्गातील ७५ अपंग व्यक्तींचा स्वतःच्या पगारातून ७५ अपंगांचे लाईफ टाईम हप्ते भरून असे एकुण दीड कोटी रूपयाचा प्रत्येकी २ लाख रूपयाचा विमा उतरवून अपंगांप्रती सामाजिक बांधीलकी जोपासला आहात, तसेच आपण अपंगांना शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांना मदत करत आहात. या सर्व सामाजिक कार्याची नोंद घेऊन आपली राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य सचिव या पदावर नियुक्त करत आहोत.
यापूर्वी महासंघात राज्य उपाध्यक्ष व राज्य कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सदरची निवड सत्कारनी लावनेसाठी महाराष्ट्रभर फीरून अपंगांच्या अडीअडचनी समजून घेऊन शासनस्तरावर मांडून सर्व अपंगांना सर्वेतोपरी सहकार्य करावे. याच बरोबर अपंगाचे जास्तीत जास्त बचत गट करूण अपंगांना स्वतःच्या पायावर समर्थपने उभे करण्यासाठी सर्व जिल्ह्यात जनजागृती करावी. अपंगांना असणाऱ्या सर्व सोई सवलती तळागाळातील अपंगापर्यंत पोहचवाव्यात. व सध्या अस्तित्वात असलेले शासन निर्णय व योजना यांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न करून. तालूका व जिल्हा स्तरावरील छोट्या मोठ्या अपंग संघटनाना एकत्र करून राज्य पातळीवर अपंगाचे प्रश्न माडून अपंगांना न्याय देणेसाठी प्रयत्न करावेत व महासंघाची व्याप्ती वाढवण्यास प्रयत्न करावा.