सावंतवाडी, दि.०७ : रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजित टिळवे यांच्या संकल्पनेतून कोलगाव विद्यालयातील दहावीच्या विदयार्थी-विद्यार्थीनीना स्टडी ॲपचे वाटप करण्यात आले.
या ॲप द्वारे मुलांना अभ्यास करणे सोईचे होणार आहे .
यामध्ये दहावीचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, दहावीनंतर नेमकं काय करावे याची माहिती आहे.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोस्कर,सचिव आबा कशाळीकर,अभिजीत टिळवे विद्यालयाच्या मुख्यध्यापिका सौ. ढोके मॅडम, श्री मेस्त्री सर, लाडू जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.