महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाल्याचे औचित्य
सावंतवाडी, दि. ५ : निरवडे गावातील कु. प्रशांत रविंद्र भाईडकर याची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे निरवडेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने सावंतवाडी उपतालुका प्रमुख संदिप पांढरे, शाखाप्रमुख संदिप बाईत, तळवडे विभागप्रमुख रोहन मल्हार, ग्रामपंचायत सदस्य, दशरथ मल्हार, सौ. रेश्मा पांढरे, सौ. प्रगती शेटकर, व भाईडकर वाडीतील तथा निरवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.