म्युझिक कॉर्नरच्या ‘लकी ड्रॉ’चे शिक्षणमंत्री ही ठरले लकी ! मानकरी !

0
65

…तर पहिल्या TVS Zest टू व्हीलरचे संतोष पास्ते ठरले मानकरी

सावंतवाडी,दि.२३: येथील सुप्रसिद्ध ‘म्युझिक कॉर्नर’च्या माध्यमातून दसरा, दिवाळी निमित्त डबल ट्रिपल धमाका ऑफर ठेवण्यात आली होती. फायनान्स आणि रोख खरेदी 5990/- रुपयांच्या पुढे कोणत्याही वस्तुवर एक लकी ड्रॉ कुपन देण्यात आलं होतं. हे लकी ड्रॉ कार्तिकी एकादशी निमित्त चिमुकल्यांच्या हस्ते काढण्यात आले. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर देखील लकी कुपन विजेते ठरले आहेत.

म्युझिक कॉर्नरच्या या लकी ड्रॉ ऑफरमध्ये पहिल्या TVS Zest टू व्हीलरचे मानकरी कलंबिस्त गावचे विद्यमान उपसरपंच सुरेश पास्ते यांचे चिरंजीव संतोष पास्ते हे ठरले आहेत. द्वितीय क्रमांकांच्या मोबाईलसाठी राजेंद्र लेंगडे हे लकी विजेते ठरले आहेत. तर तृतीय क्रमांकाच्या 32 इंची Smart LED टिव्हीचे लकी विजेते शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर ठरले आहेत. विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी येथील शोअरूमध्ये हा लकी ड्रॉ काढण्यात आला. सिया मारगी, आर्या पाटील, संदीप प्रजापती, रिशब हावळ या चिमुकल्यांच्या हस्ते हे लकी ड्रॉ काढण्यात आले.
म्युझिक कॉर्नरचे राजन हावळ यांनी या ऑफरला ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानत तिनही लकी ड्रॉ विजेत्यांचे अभिनंदन केलं आहे. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे या लकी ड्रॉ’ मध्ये मानकरी ठरले हे आमच भाग्य आहे अशी भावना व्यक्त केली.

यावेळी म्युझिक कॉर्नरचे राजन हावळ, रितेश हावळ, रमेश हावळ, रितिका हावळ, बजाज फायनान्सचे प्रमुख संदिप कराळे, सय्यद रसूल, प्रविण पाटील, अमर माने, आयनेटचे सुबोध शेलटकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या ‘लकी ड्रॉ’बद्दल आनंद व्यक्त केला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घेतलेल्या वस्तूंला कार्तिकी एकादशीच्या दिवशी शुभलाभ झाल्याची भावना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत म्युझिक कॉर्नरच्या या उपक्रमाचे कौतुक केलं. ग्राहकांना गेली अनेक वर्षे दर्जेदार सेवा देणाऱ्या हावळ कुटुंबानं अशीच सेवा म्युझिक कॉर्नरच्या माध्यमातून द्यावी असं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here