भाजप प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी दादा बेळणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन
कुडाळ,दि.१०: सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमन पदी आज भाजपचे दादा बेळणेकर यांची निवड करण्यात आली.
नियुक्ती नंतर दादा बेळणेकर यांनी भाजपचे प्रदेशचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांची सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.यावेळी विशाल परब यांनी दादा बेळणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. सर्वोदय पतसंस्थेची निवडणूक गेल्या आठवड्यात झाली होती. त्या निवडणुकीत दादा बेळणेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल विजयी झाले होते. त्यानंतर दादा बेळणेकर यांची आज चेअरमन पदी निवड झाली. ही निवडीनंतर दादा बेळणेकर यांच्यासह अनेक संचालकांनी विशाल परब यांची भेट घेतली. यावेळी विशाल परब यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.