तात्काळ पंचनामे करा… निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे
सावंतवाडी,दि.०६: तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुपारी ०३ ते ०५ या दरम्यान पाऊस पडल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील हे भात कापणी वेळी ठिकठिकाणी भेटी देत आहेत किंबहुना ते शेतात वावरत आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु ज्या पद्धतीने ते फिरत आहेत त्याच पद्धतीने त्यांनी उद्या कृषी अधिकारी, तलाठी यांना सावंतवाडी तालुक्यातील निगुडे, रोनापाल, मडुरा पाडलोस, इन्सुली आदी भागातील भात शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगावेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अतोनात भात शेतीचे नुकसान झाले आहे. भातामध्ये पाणी शिरल्यामुळे सदर कापणी वेळेत झाले असली तरी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडलेला आहे.
याला कुठेतरी यातून बाहेर काढावा व भात शेतीचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी निगुडे माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.