तळकट धनगरवाडी येथील सोलर लॅम्प चे ग्रामसेवा मंडळ मुंबई अध्यक्ष दीपक मळीक यांच्या हस्ते लोकार्पण…

0
78

दोडामार्ग,दि .०१: तळकट धनगरवाडी येथे तीन सोलर लॅम्प बसविण्यात आले आहेत याचे उद्घाटन तळकट ग्रामसेवा मंडळ मुंबई चे अध्यक्ष दीपक मळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
धनगरवाडी रोडवर गेली कित्येक वर्षे इलेक्ट्रिसिटी ची लाईन नसल्यामुळे स्ट्रिट लाईट बसवण्यात आली नव्हती,त्यामुळे या रोडवर अंधार पडत होता.
या ठिकाणी सोलर लॅम्प बसवण्याचा ग्रामपंचायतीने निर्णय घेतला व या रोडवर तीन सोलर लॅम्प बसवण्यात आले. त्यामुळे धनगर वाड्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या उद्घाटना वेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, उपसरपंच रमाकांत गवस, ग्रामपंचायत सदस्य पूर्वी सावंत, शशिकांत राऊळ, विवेक मळीक, माजी सरपंच धुरी , सोसायटी चेअरमन अंकुश वेटे, संचालक गोविंद देसाई, मुंबई मंडळाचे सदस्य लक्ष्मण सावंत, सिताराम सावंत, सदानंद राणे, तळकट ग्रामस्थ दुर्गाराम गवस, रमेश शिंदे, प्रसाद नाटेकर, सुरेश काळे, भरत सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू देसाई, राजेश लांबर इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here