सागर सावंत व मनोज सावंत मित्र मंडळाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक
सावंतवाडी,दि.०६: तालुक्यातील ओवळीये गावचे माजी उपसरपंच सागर सावंत व मनोज सावंत यांनी स्वखर्चातून ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झाडे तोडून साफसफाई केली.
रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढल्याने येथून ये -जा करण्याऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागत होती ही बाब लक्षात घेऊन गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सागर सावंत, मनोज सावंत, संतोष सावंत, हनुमान सावंत, नितेश सावंत, सचिन गवस, बळीराज सावंत यांचे पुतणे यशवंत सावंत यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविली. व दाणोली ते ओवळीये गावापर्यंत दिशादर्शक फलक लावून गावात असलेले एसटी बस स्टॉप स्वखर्चातून दुरुस्त केले.
गावाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या सागर सावंत मित्र मंडळाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.