सावंतवाडी,दि.३० : येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोती तलाव भोवती सावंतवाडीकरांनी गर्दी केली होती.
यावेळी अर्पण करण्यात आलेल्या मनाचा नारळ सावंतवाडी राजघराण्याकडून देण्यात आला होता..
यावेळी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले आणि सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते नारळाचे विधिवत पूजन करून नारळ तलावात अर्पण करण्यात आला .यावेळी सावंतवाडीकरांनी गर्दी केली होती. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी पौर्णिमा उत्सव सावंतवाडीत मोठ्या संख्येने साजरा करण्यात येतो. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गर्दी दिसली नाही तरी मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले श्रद्धाराणी भोसले,अर्चना परब, पुजा दळवी, दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते



