सावंतवाडी,दि.२५: तालुक्यातील शिरशिंगे परबवाडी येथील युवक विठ्ठल लवू परब (वय ४५) हा आजविठ्ठल लवू परब (वय ४५) असे त्याचे नाव आहे.
पंचायत समितीत दाखला आणायला जातो, असे सांगुन घरातून निघून गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे.
याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद त्याचे नातेवाईक सत्यवान परब यांनी दिली आहे. यात त्यांच्या म्हणण्यानुसार विठ्ठल याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. तो दाखला आणण्यासाठी जातो, असे सांगून घरातून निघून गेला होता. परंतु अद्याप पर्यंत परतलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.