कालेली येथे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाची दिमाखात सांगता…

0
103

माणगाव,दि.१४: कालेली ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमीत्ताने आज सकाळी १४ ऑगस्ट रोजी ७.४५ ला ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला . ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच स्वातंत्र्य वीर व शहिद विरांच्या स्मरणार्थ जो शिलाफलक उभारला आहे त्याचे अनावरण माजी सैनिक , निवृत्त पोलीस कर्मचारी ,सरपंच ,उपसरपंच , पोलीस पाटील , शिक्षक व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडले.

दरम्यान आपल्या देशासाठी सेवा बजावीत असलेल्या किंवा ज्यांनी देशसेवा केली आहे. अशा सैनिक , पोलीस दलातील कर्मचारी यांचा सत्कार समारंभ कालेली ग्रामस्थ व ग्रामपंचायत कालेली मध्ये संपन्न झाला .
यावेळी व्यासपीठावर सरपंच आरोही चव्हाण , उपसरपंच सुधाकर पडकिल,कृषी सहाय्यक डिसोझा साहेब , सदस्य विजय चव्हाण , सदस्य अंजली पेडणेकर , सदस्य सानिका परब . सदस्य राजन शेळके ,पूर्वा परब ,सहयोगीता सावंत , आदी उपस्थित होते माजी पो.पाटील सोनू गणपत चव्हाण पोलीस पाटील गणेश कालेलकर उपस्थित होते .

यावेळी शाहिद विरांना श्रध्दांजली वाहण्यात आली ग्रामसेवक विकास मुळडदेकर यांनी पंचप्रण शपथ दिली . या सर्वच कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचलन नांचे सर यांनी केले एकूणच कार्यक्रम यशस्वी पार पडला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here