माणगाव खोऱ्यात विजेचा लपंडाव सुरूच…

0
76

येथील सुमारे ३० गाव अंधारात.. अधिकारी मात्र सुशेगात..

कुडाळ,दि.२५ : तालुक्यातील माणगांव खोऱ्यात गेल्या आठ दिवसापासून विजेचा लपंडाव सुरूच आहे. त्यात तब्बल ३० गावात वीज गायब आहे. मात्र वीज कंपनीचे अधिकारी सुशेगात आहेत. वेळेवर कार्यालय सुरु होत नाही असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
येथील महावितरण ऑफिस मधील कार्यकारी अभियंता शेळके यांना विज समस्या बाबत विचारणा केली असता ते फोन उचलत नाहीत व कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत. अशा या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक पोल आहे तर दुसरीकडे झाडी वाढल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे या प्रकाराला नेमका जबाबदार कोण…? असा सवाल करुन याची अधिकार्‍यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगांव मधील ३० सुमारे गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यात शिवापूर, विरवाडी, दुकानवाड, अंजिवंडे, उपवडे,पुलास, हळदीचे नेरुर, चाफेली, वडोस,गोठोस, निवजे, आंबेरी, मोरे,कादुळी ,कालेली, घवनाळे, यासह अनेक गावांचा समावेश आहे. याबाबत वारंवार लक्ष वेधून सुध्दा वीज अधिकारी काहीच करताना दिसत नाही. कार्यालयाकडुन साधा फोन उचलला जात नाही. अधिकारी, कर्मचारी बाहेर गेले आहेत, असे सांगून वेळ काढला जात आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत तात्काळ दखल घेवून अंधारात असलेल्या गावांन मध्ये वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी निलेश जाधव, शुभम राऊळ, राजन मौर्य, शेख, प्रशांत चव्हाण , दाजी पडकिल, अनिल पेडणेकर, सागर चव्हाण, कृष्णा कालेलकर ,आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here