सिंधुदुर्ग,दि.१९: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना उद्या गुरूवार दिनांक २० ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी रात्री उशिरा काढले आहेत.
पालघर रत्नागिरी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. सिंधुदुर्ग मध्येही पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दुजोरा दिला आहे. सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.