सावंतवाडी, दि. २२ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व विधी व जनहित कक्ष राज्य अध्यक्ष अँड .किशोर शिंदे यांच्या सूचनेनुसार अँड .अनिल केसरकर यांची मनसे विधी व जनहित कक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे .या बाबतचे नियुक्ती पत्र आज विधी व जनहित कक्ष राज्य सरचिटणीस अँड .राकेश पेडणेकर यांनी दिले .यावेळी मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ,विद्यार्थी सेना जिल्हा संघटक आशिष सुभेदार ,माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत,माजी शहर अध्यक्ष सतीश आकेरकर ,माजी विभाग अध्यक्ष सुनील आसवेकर ,माजी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर ,माजी शाखाध्यक्ष राकेश परब ,केतन सावंत ,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष कौस्तुभ नाईक, शतायू जाभळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान या निवडीबद्दल मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी ,कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन राणे ,माजी सावंतवाडी तालुका संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी अँड. अनिल केसरकर यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.