सावंतवाडी वन विभागामार्फत लोकसहभागातून मळगाव घाटीची स्वच्छता……!

0
76

सावंतवाडी, दि.२२:
दरवर्षी ५ जून रोजी साजऱ्या होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने सावंतवाडी ते मळगाव ब्रिज दरम्यान वाटेत लागणाऱ्या मळगाव घटीत साचलेल्या कचऱ्याची आज सकाळी ०७ वाजलेपासून ते १० पर्यंत सावंतवाडी वनपरिक्षेत्राचा सर्व स्टाफ तसेच माजगाव ग्रामपंचायत व मळगाव ग्रामपंचायत यांचे सहभागातून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये मळगाव घाटी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या सर्व कचऱ्याचे संकलन करून तो कचरा नगरपालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात पोहोच करण्यात आला.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून या वर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने LiFE(Lifestyle For Environment) या उपक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी आपल्या जीवनशैली ७५ प्रकारचे विविध पर्यावरण पूरकबदल अंगिकारणे हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. जसे की सिंगल युज प्लास्टिकचा वापर थांबवणे, जवळच्या अंतरावरील प्रवासासाठी सायकलच्या वापरला प्रोत्साहन देणे, विजेचा वापर काटकसरीने करणे, परिसर स्वच्छता इत्यादी विविध बदलांचा समावेश करण्यात आलेला आहे. या स्वच्छता कार्यक्रमामध्ये सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांच्यासह सर्व सावंतवाडी वनपरिक्षेत्र स्टाफ, मळगावच्या सरपंच श्रीमती स्नेहल जामदार, माजगावच्या सरपंच डॉ. अर्चना सावंत व त्यांचे पति श्री. अजय सावंत यांचे सोबतच युवानेतृत्व सचिन मोरजकर हे सहभागी झाले होते.
तरी सावंतवाडी वन विभाग, ग्रामपंचायत माजगाव व ग्रामपंचायत मळगाव यांचेकडून सावंतवाडी शहरातील सर्व सुजाण नागरिकांना विनंती करण्यात येते की कृपया आपल्या घरातील कचरा येताजाता मळगाव घाटीमध्ये न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी. आपला हा टाकलेला कचरा दुर्गंधी सोबतच पर्यावरण व वन्यजीव यांचेसाठी खूपच घातक सिद्ध होत आहे अशी प्रतिक्रिया RFO मदन शिरसागर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here